0
4
8
2
9
4
झाकणझुल्या
जाऊन बसतो मागे सर्वात
झाकणझोल्या येताच बाई
आठ दिवस शाळेला दांडी
खोटी आजारी पाडतो आई…!!
गृहपाठ अपूर्ण असेल तर
विसरली म्हणतो घरी वही
अभ्यासाचा फार कंटाळा
कारण रोज काहीना काही…
पाऊल टाकताच वर्गामध्ये
बडबड करी न थांबता सुरु
आता गप्प शांत बसतो बाई
नका ना तुम्ही घरी फोन करू…!!
क्षणात पुन्हा करीतो बडबड
स्वभाव आहे खोडकर फार
नाही लागत कोणीच नादी
त्याला पाहून विद्यार्थी पसार…!!
मैदानावर खेळ खेळताना
खेळाचे नियम येतात सर्व
खेळात जिंकल्यावर त्याचा
विनाकारण वाढलेला गर्व….!!
राजश्री मिसाळ ढाकणे,बीड
0
4
8
2
9
4



