0
4
8
2
9
3
संवेदना
कठोर झालाय माणूस
बोथट झाल्या संवेदना
जाणून कोणी घेईनात
कुणाच्याही अंतर्वेदना.. //
आटला खोल ओलावा
उगाच कोरडा उमाळा
उरलीय औपचारिकता
सरला आता जिव्हाळा.. //
दुःख भार हलका होई
असा आधार मिळेना
असह्य एकाकीपणात
घास गिळता गिळेना.. //
कोसळले आभाळ पर
हाल कुणास पाहवेना
उलट शब्दही धारदार
हा मार वर्मी साहवेना.. //
सांत्वनाचे शब्द दुर्मिळ
मीठ प्रत्येकाच्या हाती
जखम खुली करण्यास
वाटते आता खूप भिती.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
3



