0
4
8
2
9
0
जुना गडी नवा डाव
खूप झाल्यात घोषणा
अन् खूप झालेत मोर्चे
जुना गडी नवा डाव
खेळ रंगलेत वरवरचे ॥
मी करतो मारल्यासारखं
तू कर रडल्यासारखं
आतून सारे आपण भाऊ
लोणी खाऊ टाळूवरचं ॥
जनता उपाशी मेली तरी
काय त्याचे सोयरसूतक
हक्कासाठी लढणाऱ्याला
घोषीत केले जाईल मृतक ॥
राजकारण नावाचा
खेळ खेळून पटांगणात
दोन्ही चमूत आपलेच गडी
डाव जिंकून रिंगणात ॥
डाव नवा असला जरी
गडी मात्र जुनाच
आपले खिसे भरून
जनहिताला मात्र चुनाच ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
0
4
8
2
9
0



