Breaking
कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

अहंकार; कुसुम पाटील

कोल्हापूर

0 4 8 2 9 4

अहंकार

मनाचा विकार अहंकार
उध्वस्त करतो जीवन
अहंकाराचा करावा त्याग
सर्वांशी वागावे प्रेमान

कालची हिरवळ असते
उद्या त्याचा पालापाचोळा
वारा आला उडून गेला
जवळ ठेवा माणुसकीचा मेळा

गर्व कशा करू नये
दुःखितांचे दुःख जाणाव
माणुसकी सोडू नये
अहंकार मनी नसाव

निसर्ग किती सुंदर आहे
सृष्टीतले जीवजंतूही
एकमेकाचे सुखदुःख जाणती
दुसऱ्याला आनंदात राही

मनी नम्रता असावी
उगा बाळगू नको अभिमान
स्वतःची जाण असू दे तुला
कधीच तोडू नको स्वाभिमान

गर्वाचे घर असते खाली
प्रेमाने येईल ते वरती
क्षणभंगुर जीवनाचा अहंकार
विनाशाचे कारण बनती

तारुण्य रंग रूपाचा गर्व नको
कधीतरी वार्धक्याकडे झुकेल
मन निर्मळ आणि प्रसन्न ठेव
सत्कारमाने भरावे पान मधल

कुसुम पाटील,कसबा बावडा
जिल्हा कोल्हापूर
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे