Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

पाहमी केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव आनंदाच्या वातावरणात संपन्न

रजत डेकाटे -प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

पाहमी केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव आनंदाच्या वातावरणात संपन्न

रजत डेकाटे -प्रतिनिधी
भिवापूर -मालेवाडा
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नागपूर: (दि २१): भिवापूर पंचायत समिती अंतर्गत जि.प.उ. प्राथमिक शाळा सालेभट्टी जवळी शाळेच्या मैदानावर पाहमी केंद्र अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात पाहमी केंद्र अंतर्गत येणाऱ्या बारा शाळेमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.

भिवापूर पंचायत समितीचे सदस्य कृष्णाजी घोडेस्वार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय जिडगीलवार, सालेभट्टी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर जगताप,सरपंच सुनंदा इरपाते तसेच शाळा समितीच्या अध्यक्षा सारिका लेदाडे, उपाध्यक्ष दिवाकर चव्हाण या मान्यवरांची उपस्थित कार्यक्रमाला लाभली होती.

कबड्डी,खो-खो, लंगडी,लांब-उडी, उंच उडी, रिले, कुस्ती, यासह अन्य खेळाचे सामने तसेच एकलनृत्य, सामूहिक नृत्य, गीतगायन,नक्कल, बुद्धिबळ, आदी स्पर्धांचा समावेश होता. या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहमी केंद्रातील कबड्डी मुले पाहमी, कबड्डी,लंगळी मुली मालेवाडा (गोटाळी), सामूहिक नृत्य मालेवाडा शाळेतील स्पर्धक विजयी ठरले.

क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बॉक्सेस वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख प्रशांत टेंभुर्णे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रवीण गिरडे यांनी तर  ज्ञानेश्वर जगताप यांनी आभार मानले. गजू गोंगल, किशोर ढगे, पियुष सवाई, पोलीस पाटील विकास वांढरे, ग्रामपंचायत सदस्य विष्णुदास धेटे, विकास भावे, विजय मेश्राम,आचल मेश्राम, वर्षा चापले, वर्षा कश्यप तसेच पाहमी केंद्रातील शिक्षक व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रीडास्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिला रोडे, विकास राठोड,राजु बारेकर, रामचंद्र लव्हे, पद्माकर ठाकरे,लांडे सर, सुरज येल्ले,मुंगले सर, बानवगडे सर, मेश्राम सर, बावनकर मॅडम, ढाकणे सर, डोंगरे सर, भोयर मॅडम, सुनिता ठाकरे मॅडम, कायरकर मॅडम, अशोक मेश्राम, संपूर्ण पाहमी केंद्रातील शिक्षक तसेच अंगणवाडी वंदना सांबरे, रंजना धेटे, सुनिता कन्नाके या संपूर्ण गावकरी मंडळींनी सहकार्य केले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे