*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*
*🌤️विषय : ऊब मायेची🌤️*
*🔹गुरूवार : १६ / ०१ /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १५४ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*ऊब मायेची*
मिळते ऊब मायेची
बाळाला आईच्या कुशीत
स्वर्गसुखही भासे फिके
भासतो इतक्या खुशीत…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
आई देत असते उब मायेची
नाहीसा होतो सारा शीण
आईची मायाच अनमोल
शाब्दिक वर्णन करणे कठीण
*सचिन पाटील*
*(अलिबाग, रायगड)*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
आई नित्य देत राही
उब मायेची लेकराला
निर्व्याज प्रेम देण्याचा
वसा तिने स्वीकारला
*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
आईच्या कुशीत बाळाला
ऊब मिळे मायेची हमखास
मायलेकरांच्या नात्याची वीण खास
मनःशांती मिळेल जीवास
*सौ लता आरेकर इचलकरंजी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
हाडा मासाचा गोळा
उदरी वाढवी माय माऊली,
हाताचा करून पाळणा
देई शीतल सावली.
*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
हर्षून जाई आईच मन
मिठीत घेता बाळाला
मिळता ऊब मायेची
निवांत झोपी तान्हुला
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
घरट्यातल्या पिलांना
अंकुरत्या रोपट्यांना
ऊब मायेची हवी ना
जगतांना साऱ्या जीवांना
*सौ सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
ऊब मायेची आईच्या प्रेमाची
वात्सल्याची मिळे कुशीत
शांतता ,ऊबदार मिळतो
बाळ झोपते आनंदाने खुशीत
*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
असेल कीतीही थंडी
बाहेर असिम संकटांची…
आईच्या कुशीत शिरताच
मिळते प्रेमळ ऊब मायेची…
*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १५४ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*ऊब मायेची*
देते धीर उब मायेची,
गरज त्यास आईच्या कुशीची,
वात्सल्य मूर्ती ती आईची,
लाली आई बाळ हास्याची//
*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
ममत्वाने भरलेली ऊब मायेची
परमेश्वर रूपी आईचा कुशीत..
लांबून पाहता ती वात्सल्य मूर्ती
बाळाचे मुख झाले आनंदाने हर्षित..
*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
जोवर मिठी वात्सल्याची
मिळते ऊब मायेची
कुशीत स्वर्गसुखाची तृप्ती
राखण होते कायेची
*सविता धमगाये,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
दुःखा पासून दूर ठेवी
अशी हि ऊब मायेची
बाळाला घेऊन कुशीत
तहाना भागवते ममत्वाची
*विजय शिर्के , छं . संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
ऊब मायेची देवून बाळाला
आई पुरविते सर्व लाड हट्ट
आई नि बाळाची म्हणूनच
तर असते एकच नाळ घट्ट
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
*ऊब मायेची*
उदरात जपता नऊ मास
भार ना बाळाचा होई
ऊब मायेची देण्यास
आतुर असते ती आई
*सौ. रजनी भागवत*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💞🔹♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



