Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

मनाचा कमकुवतपणा

वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा पुणे

0 4 8 2 9 0

मनाचा कमकुवतपणा

मनाच्या विविध व्याख्या आहेत. मन खंबीर आहे. मन भावनिक आहे. मन रडते देखील. मन हसते देखील. मन कमकुवत आहे.अनेक भावनांचा गुंता या मनामध्ये आहे. बघा आपण एवढे गुंतलेलो आहोत आपल्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये की मनाचा गुंता निघता निघत नाही. आपल्याला आतून आता झाला की, आपले मन आनंदी होते. मन आनंद झाला की आपण इतरांची सुसंवाद छान साधतो. विचारांची देवाण-घेवाण छान होते. जर मन दुखी असेल किंवा खिन्न, तर आपण जास्त कोणाशी बोलायला जात नाही. शांत शांत असतो. सर्वांशी अबोला धरल्यासारखे आपणच शांत आणि अबोला असतो. समोरचा पण विवंचनेत पडतो अरे हिला झालं काय?याला झालं काय?

कोणी व्यक्ती गेला किंवा आपल्या घरामध्ये एखादे दुर्दैवी, दुःखद घटना घडली तर आपण रडतो, मनातले विचार कथन केले जातात. मन खिन्न होते. शांत बसावेसे वाटते. कोणाशीही बोलू नये असे वाटते. मन खंबीर देखील आहे. आपल्यासमोर आपल्या कुटुंबातील माणूस जर का आजारी पडला तर, किंवा त्याचा एक्सीडेंट अचानक झाला तर आपण असा स्टॅंड घेतो भावना सर्व बाजूला ठेवतो, आणि पहिले डॉक्टर गाठतो. डॉक्टर जे सांगतील त्यासाठी आपण प्रयत्न करतो. कारण आपला माणूस आपल्याला हवा असतो. कितीही कष्ट झाले आपल्याला तरी आपण त्या कृती करतच राहतो.

मन कमकुवत देखील आहे. आपला स्वतःचा नवरा आजारी पडला आहे. घरात पैशांची तजवीज नाही. सर्व त्याकरता पुरुषावर अवलंबून आहे. अशावेळी बाई कमकुवत पडते. तिचे मन ढासळते. नवरा ऍडमिट झालाय. ऍडमिट करायला सुद्धा पैसा नव्हता. पण तरी देखील कोणाकडून घेऊन तिने त्याला ऍडमिट केलं. आता पुढे काय?? असे नाना प्रश्न, विचार डोक्यात असतात. पण मनाचा हा कमकुवतपणा बाजूला सारून अनेक संकटांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला तोंड उघडावेच लागते. इतरांची मदत मागावीच लागते. यासाठी आपण मनाचा कमकुवतपणा बाजूला करायचा आहे. मनाच्या कमकुतेवर खंबीरपणाची पाटी लावायची आहे. तर मग मैत्रिणींनो, मित्रांनो ह्या अशा मनाच्या विविध व्याख्या आहेत. मनाच्या या व्याख्याना आपण पार करत, आपले जीवन जगत असतो.

जगायचे तर समाजात खंबीरपणे पाय रोवा आणि जगा. मी सुद्धा खूप भावनिक आहे. पण मन मात्र खंबीर आहे. या खंबीरपणामुळे आज माझ्याकडे काही संकट येतात, त्या संकटांना मी पार करून संसारात समाजात उभी आहे. ताठ मानेने जगत आहे. चला तर मग आपण सर्वजण मिळून मनाला या खंबीर बनवूया. आपल्या सकारात्मक आणूया. नकारात्मकतेला ‘बाय-बाय’ करूया..!

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे