मी पाहिलेला ‘बोधीवृक्ष
गोवर्धन तेलंग
मी पाहिलेला ‘बोधीवृक्ष’
‘मराठीचे शिलेदार’ समूह बहुउद्देशीय संस्था नागपूरचे
संस्थापक, अध्यक्ष आ. राहुल पाटील यांना मी बोधीवृक्ष संबोधतो. ज्ञान ,समर्पण, त्याग व माणूस माणसाशी जोडण्यासाठी अलौकिक कार्य यासाठी तन, मन, धनाने समर्पित होऊन मराठी भाषेचा ध्यास धरून तिचे सक्षमीकरण करण्यासाठी, ध्येय उरात बाळगून जीवनाची वाटचाल करणारं मानवी आयुष्य म्हणजे आ.राहुल पाटील. आपणास माझा दंडवत, शतशः प्रणाम…!
मराठी भाषेच्या सक्षमीकरणाचा ध्वज खांद्यावर घेऊन प्रवासात वाटचाल करणारं आयुष्य म्हणजे राहुल पाटील. स्वतःचे पाय मराठी मायेच्या मातीत घट्ट करून या मातीतलं नवांकुर म्हणजे ‘राहुल पाटील’. ओसाड जीवनात साक्षात मराठी मायची सावली म्हणजे राहुल पाटील. शांती करुणा मैत्री, उत्साहाने मोहरलेला जगण्याची प्रेरणा, श्वासातला प्राणवायू, आनंदाने माणसात दरवळणारा सुगंध म्हणजे राहुल पाटील. मी शब्दात कितीही गुंफलो तरी, त्याही पलीकडे असणारे व्यक्तिमत्त्व. आ. दादासाहेब राहुल पाटील. आपले मनापासून अभिनंदन, दंडवत.
आदरणीय विष्णू दादा, प्रशांत दादा, सविताताई, स्वातीताई
तारकाताई या वृक्षाच्या हिरव्या हिरव्या फांद्या, आनंदाने साहित्य वा-यासंगे मधूर डोलणारे. आम्हीही या फाद्यांवरची हिरवीगार पाने तितक्याच दिमाखात साथ देणारे. सगळं विश्व साहित्य हिरवाईने सुशोभित. वाह अप्रतिमच…!
‘गौरव अभिजात मराठी 2025’ हा कार्यक्रम भारतरत्न मौलाना अबुल कलाम सभागृहात छ. संभाजी नगर येथे दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा मी साक्षीदार झालोय ..हे माझे भाग्य समजतो. अगदी बहारदार, आनंदोत्सव कार्यक्रम सुनियोजित, सुत्रबध्द, स्वागत, समारोप भोजन सगळं कौतुकास्पद. एक मायेचा कुटुंबवत्सल क्षण, अलौकिक आनंद. उत्साह, प्रेरणादायी असे क्षण भाग्यवंतानाच लाभतात. त्यातील मी एक आपणा सर्वांना माझा नमस्कार. सर्वाचे खूप खूप अभिनंदन.
गोवर्धन तेलंग
‘स्पंदन’कार ता.पांढरकवडा
========



