Breaking
नागपूरमहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ‘नारायण बागडे’ २६ जुलै पासून उपोषण करणार

रजत डेकाटे प्रतिनिधी

0 4 8 2 9 7

आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ‘नारायण बागडे’ २६ जुलै पासून उपोषण करणार

रजत डेकाटे प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात महार मांग, चांभार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांना महाराजांनी आर‌क्षण देवून समता बंधुता न्याय स्थापित केले तो दिवस म्हणजे २६ जुलै डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या या कार्याला संविधानात समाविष्ट करून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या आरक्षण आज धोक्यात आले आहे याची तंतोतंत पालन अंमलबजावणी होतांना दिसत नाही या करिता शासनाचे व विरोधी पक्षाचे लक्ष वेधण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे येत्या २६ जुलै पासून नागपूर येथील संविधान चौकात उपोषणाला बसणार आहेत.

अनुसूचित जाती जमाती, यांना कोणत्याही संघर्ष न करता आरक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने मिळाले या आरक्षणाच्या माध्यमातून समाजात मोठ मोठ्या पदावर आणि राजकारनात मंडळी गेली परंतु हीच मंडळी आज मुंग गिळून गप्प बसले आहेत विध्यार्थ्यांना वेळेस शिष्यवृत्ती नाही, शैक्षणिक आरक्षणाचा कोटा नदारत आहे, बेरोजगार तरुणांना, महिलांना महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे,संत रोहिदास आर्थिक महामंडळात हेलपाटे मारावे लागतात, रमाबाई घरकुल योजना थंडा बस्थात, जातीचे प्रमाणपत्राची जाचक अट, या विषयावर समाजात मोठी निराशाजनक चिंता व्यक्त होत आहे.

याकडे आंबेडकरी नेते उदासीन आहेत आपले सोडून दुसऱ्याच्या नांदी लागलेली नेते मंडळी आज सक्रिय दिसत आहे बागडे सरांच्या उपोषणाला संपूर्ण राज्यात आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आंबेडकरी महिला मोर्चा यांच्या पाठींबा राहणार आहे या साठी साहित्य भूषण अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई येथील सुमन नगर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जनजागृती करण्यात येणार आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष विकास काटे यांनी पत्रकारांना सांगितले

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे