कवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
तुझा बहाणा सविता धमगाये नागपूर
0
4
8
2
9
4
तुझा बहाणा
रोजचेच पालुपद
तुझ असते ठरलेलं
अग बाई विसरलेच
मेलं आठवणीत नाही आलं
अशी कशी आठवण तुझी
नेमकी वेळेवर विसरते
पगाराच्या वेळी मात्र
बरोब्बर आठवण राहते
तरीच म्हणते आठवणीने
बांध गाठ पदराला
अग्ग बाई विसरलेच की
संवाद जुना झाला
सोड तुझा बहाणा
रस्त्यावर ये आतातरी
नाहीतर म्हणशी काय करू
घरोघरी मातीच्या चुली
असा तुझा खोटेपणा
उघड बघ झाला ना
गल्लीपासून दिल्लीपर्यंत
किर्ती तुझी गेली ना
सविता धमगाये,नागपूर
=======
0
4
8
2
9
4



