ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडासाहित्यगंध
उत्तरार्ध
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
0
उत्तरार्ध
वर्तमानातील खटाटोप
पलापलाने ठरतो पूर्वार्ध
अज्ञात तरीही स्पष्ट होतो
कलाकलाने गुढ उत्तरार्ध… //
भविष्य बनावे सुखकर
म्हणून आयुष्य पडे खर्ची
तारूण्यातील कष्ट व्हावे
वृद्धापकाळी आरामखुर्ची… //
ठरवावे तसेच होत नसते
जे होते तेही ठरलेले नसते
ते कुणी समजते कर्मभोग
कुणा लेखी प्राक्तन असते… //
हिम्मत कधीच हारू नये
विफल होताच पराकाष्ठा
सफल होण्या जीवनगाथा
कधी ना ढळावी कर्मनिष्ठा… //
सुख, दुःख, यश,अपयश
जीवनाचा एक भाग आहे
जीवन म्हणजे भोग नव्हेच
तर तो असिम त्याग आहे… //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
==≠=======
0
4
8
2
9
0



