Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगोंदियाविदर्भ

शारीरिक व मानसिक संतुलनासाठी योग प्राणायामाची कास धरावी

तारका रूखमोडे, प्रतिनिधी

0 4 8 2 9 7

शारीरिक व मानसिक संतुलनासाठी योग प्राणायामाची कास धरावी

योग शिक्षक कांतीकुमार बोरकर

तारका रूखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: बदलत्या आधुनिक जीवनशैली मुळे प्रगती करत असतांना पाश्चात्त्य जीवन शैलीचे दुष्परिणाम समोर येत आहेत,परिणामी मानसिक व शारीरिक आरोग्य प्रभावित होत आहे . शारीरिक व मानसिक आरोग्य साधून संतुलित जीवनासाठी योग प्राणायामाची कास धरावी असे प्रतिपादन योग शिक्षक कांतीकुमार बोरकर यांनी केले.

ते श्री गणेश बहुउद्देशीय संस्था अर्जुनी/मोर.द्वारा संचालित जयदुर्गा विद्यालय गौरनगर द्वारा गौरनगर येथे आयोजित पाच दिवसीय योग प्राणायाम शिबिरामध्ये शिबिरार्थ्यांकडून योगाभ्यास करून घेतांना ते बोलत होते.

दिनांक २४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२४ दरम्यान ग्राम पंचायत परिसर मंदिर प्रांगणात पार पडलेल्या शिबिरामध्ये कांतीकुमार बोरकर यांनी क्रीडा शिक्षक नितीन गणवीर, सहा.शिक्षक संतोष बिसेन,शालेय योग समिती प्रमुख अर्पिता सरकार, कृष्णा सरकार, निशा मिस्त्री,जान्हवी कापगते,प्रेम सरकार यांच्या साहाय्याने उपस्थित विद्यार्थी व पालकांकडून योगाभ्यास करवून घेतला.

सकाळी ५.३० ते ७.०० या वेळात संपन्न शिबिरामध्ये यौगिक जॉगिंग, सूक्ष्म व्यायाम, विविध आसने, सूर्यनमस्कार,दंड बैठक,स्वामी रामदेवजी महाराज प्रणित प्राणायाम,ध्यान सोबतच आयुर्वेद यावर प्रकाश टाकून उपस्थितांकडून योगाभ्यास करून घेण्यात आला.

विद्यालयाचे प्राचार्य सुनीलकुमार पाऊलझगडे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक भुवेंद्र चौहान,प्रवीण सिंगाडे, प्रफुल्ल गोलेलवर, संघदीप कांबळे, नीरज नाकाडे, वैशाली कळपते,शंतनु साधू, निमाई मल्लिक, विद्यार्थी प्रतिनिधी अनिश मंडल, नितीन सरकार, बिरेंद्रनाथ बैद्य,फणिंद्र सरकार, निकिता सरकार, रिया मंडल, आदींनी परिश्रम घेतले. संपूर्ण गोंदिया जिल्हा परिसरात सर्वोत्कृष्ट योग शिक्षक म्हणून त्यांचं व्यक्तिमत्त्व परिचित आहे.आरोग्य बांधणीसाठी त्यांचा महत्वाचा वाटा समाजात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे