Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगोंदियानागपूरमहाराष्ट्रविदर्भ

न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

तारका रूखमोडे, प्रतिनिधी गोंदिया

0 4 8 2 9 0

न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन

नर्सरी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पालकवृंदाचेही चिमुकल्यांचे कौतुक बघण्या विशेष उपस्थिती

तारका रूखमोडे, प्रतिनिधी गोंदिया

अर्जुनी/मोर : स्थानिक न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा सायन्स ज्युनिअर कॉलेज येथे पाच दिवशीय क्रीडा सत्र तथा स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना साकारत, विविध कार्यक्रमाचा जल्लोष करत मोठ्या उत्साहात पार पडले.

अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष यशवंतजी परशुरामकर होते. उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती होमराजजी पुस्तोडे उपस्थित होते.नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे,संस्थेचे उपाध्यक्ष गिरीशजी पालीवाल, संस्था सचिव ओमकाशसिंह पवार, संचालक मंडळातील पदाधिकारी राधेशामजी भेंडारकर व व नगरसेविका ललिताताई टेंभरे ,प्राचार्य राकेश उंदीरवाडे तथा बोंडगाव येथील विद्यालयाचे माजी प्राचार्य डोंगरवार उपस्थित होते. प्रथमत: मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतीबा फुलें,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज,सरस्वती माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

तारका रुखमोडे यांनी प्रास्ताविकेत शाळेची पूर्वस्थिती व सद्यपरिस्थिती, शाळेत झालेले बदल,सुधारणा इ. चा आढावा घेतला.तथा भविष्यातील विद्यार्थ्यांच्या विकासदृष्टीकोनाचा संस्थेचा हेतू स्पष्ट केला.

यावर्षी दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तन्मय कुत्तरमारे,विद्या मस्के,अथर्व पवार,योगेश उपरीकर,डुडेश्वर हुकरे, पृथ्वी पवार यांचा पालंकासमवेत सत्कार करण्यात आला. क्रीडाक्षेत्रात तथा कलाक्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह तथा मेडल देऊन गौरविण्यात आले.त्यात राज्यस्तरावर सहभागी झालेले मितेश लांजेवार व खुशाल बुरले यांचा सत्कार करण्यात आला.

पं.स.उपसभापती होमराज पुस्तोडे यांच्या हस्ते ” Childrens dream” या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांत सुप्त गुण दडलेले असतात. अंगात असलेल्या सुप्त गुणांची ओळख झाली पाहिजे, त्या दिशेने वाटचाल केल्यास सर्वांगीण प्रगती होते . गुणांची ओळख पटविण्यासाठी शालेय जीवनात स्नेहसंमेलने ही माध्यमे असतात. यासाठी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या प्रत्येक उपक्रमात भाग घेऊन यश संपादन केले पाहिजे. असे प्रतिपादन पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे यांनी केले. यशवंतराव परशुरामकर यांनी स्नेहसंमेलनातून क्रीडा ,सांस्कृतिक व विविध कला गुण प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध होते. यातूनच व्यक्तिमत्व विकसित करण्याची चालना मिळते,डेअर्ड बना,असे प्रतिपादन केले.

शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाखात बहारदार नृत्य सादर केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव ओमप्रकाशसिंह पवार यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. व विद्यार्थ्यांना चांगलं घडविण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू अशी ग्वाही दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून ‌ नगरपंचायत उपाध्यक्ष ललिताताई टेंभरे,नगरसेवक अतुल बन्सोड,सागर आरेकर,भागवत मुनेश्वर ( उ. पा. शि. संघ),पुष्पा खोब्रागडे, चेतना मेश्राम,सामाजिक कार्यकर्ता राकेश जायस्वाल उपस्थित होते.बौद्धिक उपक्रम व विविध प्रदर्शनीमध्ये प्रथम क्रमांक पटविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीशे देऊन गौरविण्यात आले.

संचालन तारका रुखमोडे व त्रिवेणी थेर यांनी त्रिभाषेत केले. शुभेच्छा तथा आभार प्राचार्य राकेश उंदीरवाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.सुरज मोटघरे, प्रा. प्रवीण नागपुरे,सागर जांभुळकर ,चंद्रशेखर लांडगे,प्रतीक्षा राऊत,हिना लांजेवार,निकिता बन्सोड, प्रा.कैलाश दिघोरे, प्रा.विकास मेश्राम,शीला बोरीकर, पायल बोरकर,छबू बागडे,पायल राखडे,प्रतीक्षा डोंगरवार,दिनेश बागडे,ज्ञानेश्वर परिहार,विणा लांजेवार,दिपाली मसराम यांनी परिश्रम घेतले.अशाप्रकारे अगदी जल्लोषात स्नेहसंमेलन पार पडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे