Breaking
ई-पेपरकवितानांदेडसाहित्यगंध

दलितांचा राजा

बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड

0 4 8 2 9 0

दलितांचा राजा

रामजी भीमाईच्या पोटी
निपजला दलितांचा राजा
केला कोटी कुळांचा उद्धार
लाखात एक भीमराव माझा

कैक पिढ्यांची गुलामगिरी
साखळदंडात जखडलेली
करु दहन त्या मनुस्मृतीचे
मुक्या जीवास वाणी दिली

बा भीमा तुमच्या मर्दुमकीने
तुटल्या जातिभेदाच्या भींती
मुडद्यासम माणसांना तुम्ही
दिलीत जगण्याची हो शक्ती

अस्पृश्याचा कलंक पुसुनी
शिकण्या संघर्षाचा दिला नारा
दीनदलीतांच्या ह्रदयगाभाऱ्यात
शोभला दलितांचा राजा खरा

डाव साधून दुष्ट काळाने
आज आम्हाला पोरके केले
चैत्यभूमीवर उसळला जनसागर
साश्रु नयनांचे पाट वाहिले

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे