Breaking
ई-पेपरकवितादादरा नगर हवेलीनागपूरसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 7

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🥀विषय : लोकभ्रम🥀*
*🍂बुधवार : २०/ ०८ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*लोकभ्रम*

कित्येक लोकभ्रम
कित्येक समजूती.
लोकभ्रमा मुळेच
होतात अधोगती.!१!

लोकभ्रम समजुती
समाजात रुजती.
त्यामुळे अनेकदा
कन्याभ्रूणहत्या होती.!२!

लोकभ्रमा मुळेच
अफवा पसरत जाई.
खोट्याची खरे होऊनी
अफवांना पेव येई.!३!

कधी लोकभ्रम
वादळासारखे असे.
दूर व्हा नाहीतर
व्यक्ती त्यातच फसे. !४!

लोकभ्रम एक
भुलभुलय्या असे.
जो यात शिरला
कार्यभार जातसे.!५!

दिसते ते सत्य नव्हे
अंधश्रद्धेतून बाहेर या.
लोकभ्रम भ्रामक हो
विज्ञान जाणून घ्या.!६!

सत्याचा शोध घ्या
लोकभ्रमातून जागा.
अंधकारास दडपून.
मनाचे द्वार उघडा. !७!

लोकभ्रम हे ग्रहण
समाजाची कीड आहे.
याला संपवून टाका
तेव्हाच प्रगती आहे.!८!

*प्राजक्ता खांडेकर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*सुगत नगर नागपूर*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

नसताच कर्तव्याची जाण,
होतो अधिकार बदनाम…
नसता जाणिव कर्मताती,
अब्रुची निलामी सरेआम…१

व्यस्त सारी व्यवस्था घमंडी,
चढलाय सत्तेचा हा माज…
कुणाचे हातावरी रे पोट,
कुणाच्या माथी झळके ताज…२

करून जीवाचे जरी रान,
मिळेना पोटापुरते दाम…
झोप येईना उपाश्यापोटी,
होऊ पाहे आयुष्य तमाम …३

जीवनी आपुल्या हक्कासाठी,
मागितला अधिकार क्रम…
*सुधाकरा* कुणी म्हणे स्वार्थ,
कुणी नाव ठेवी *लोकभ्रम*…४

*सुधाकर भगवानजी भुरके*
*आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

समाजातील काही रूढी परंपरा
लोकभ्रम म्हणून पाळल्या जातात
वैज्ञानिक दृष्ट्या नसतो आधार
तरी मनात घर करून असतात

दृष्ट लागली,नजर उतरावयाला
घेती फडा,पदर,थुंकीचा आसरा
मीठ,मोहरी ओवाळून टाकतील
करतील नजर लागल्याचा उतारा

रिकामी घागर,मांजर आडवी येता
अशुभ संकेत मानल्या जातील
आले मुंगूस आडवे,भरलेली घागर
ते शुभ शकुन समजून बसतील

शुभ अशुभ आमावस्या, ग्रहणे
काही वारांनाही त्यात गोवतील
तसे सगळे वार सारखेच तरीपण
विनाकारण काही दोषी ठरतील

बऱ्याचशा खुळचट चालीरीती
पारंपारिक लोकभ्रम हे रुजतात
अडाणी अज्ञानी तर मानतील हो
सज्ञानी,सुशिक्षित बळी पडतात

तसा होत नाही काहीही फायदा
उलट होईल त्यात काहीतरी तोटा
अंधश्रध्देचे स्वरूप प्राप्त होऊन
उगाच वर्तन बदल घडतो खोटा

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

चुकीच्या गोष्टींना खरे मानून
विश्वास ठेवतात अंध बनून
वैज्ञानिकतेचा नसतो आधार
पसरतो गैरसमज निराधार ॥

पिढया न् पिढया रुढ झालेत
कित्येक लोकभ्रम समाजात
नकारात्मक विचारसरणीचा
परिणाम होतो जीवनात ॥

जाइटोणा भूतप्रेत
शुभ-अशुभ, धर्म जातीभेद
अंधश्रद्धेतून होतो गैरसमज
गुरफटत जातो माणूस सहज ॥

शिक्षणाच्या अभावातून
प्रसार पावतो लोकभ्रम
शिकले सवरले अडाणीही
अंध्दश्रद्धा पाळती अधिकतम ॥

गाडगेबाबा थोर संत
सांगून गेले आम्हांला
बँडबाजा , पैसे देऊन
विकत घेता येईल का देवाला ॥

लोकभ्रमाचे खरे कारण
त्यांना कळून चुकले
मुलांना शाळेत घाला बाबांनो
प्रबोधनाचे पाऊल टाकले ॥

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*लोकभ्रम*

किती करावी जागृती
किती करावे प्रबोधन
हटता हटेना लोकभ्रम
भुरळ घालते प्रलोभन… //

रितीरिवाज म्हणून तर
रूजल्या काही मान्यता
आज विज्ञान युगातही
त्या पाळण्यात धन्यता.. //

गंडे, दोरे, ताईत बांधून
स्वप्ने पूरी होत नसतात
दिवस रात्र एक करून
प्रयत्नच हवे असतात.. //

आजही जनमानसावर
अंधश्रध्देचे असे गारूड
फायदा कांही नाही तरी
लाटेवर जनता आरूढ.. //

मेंढराच्या कळपासारखी
होते माणसाची अवस्था
ना जाणो कधी बदलेल
तळागाळातून व्यवस्था.. //

अहितकारी लोकभ्रमात
माणूस पक्का बाटलाय
जणू हा एक बुद्धीभ्रंश
सद्सद् विवेक आटलाय… //

स्री पुरूष दोनच जाती
मानवता हा एकच धर्म
कधी कळेल माणसाला
विधात्याचे हेच खरे मर्म.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

ज्ञानाची तिजोरी भरताना
संस्कारांची शिदोरी रिती
खूप शिकून मोठे होताना
माणूसपण खुजे होती

एकुलता एक, लाडाचा लेक
शेतीवाडी, बंगला गाडी
पगार सहा आकडी
सुखातच नांदेल ना जोडी!

प्रेमापुढे कोण, माय बाप?
प्रेमासाठी करिती महापाप
भोगती तारुण्याचे शाप
ओलांडूनी अधोगतीचे माप

जातीद्वेषाचे राजकारण
होय जनतेचे मरण
झेंड्या झेंड्याचे भांडण
नेत्यास मात्र सपशेल विस्मरण

असू, कसेही, कुठेही, केव्हाही
माणूसपणाची जाण ठेवू प्रवाही
गाडून टाकून *लोकभ्रम* सारे
माणूस व्हा रे! माणूस व्हा रे!

*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

लोक काय म्हणतील या भीतीत
मनाचे किती दरवाजे बंद करून बसतो आपण,
खरे सुख हाताशी असूनही
गैरसमजांच्या साखळ्यांत गुरफटतो,
हेच तर खरे लोकभ्रम.

खोट्या कीर्तीच्या आभाळाखाली
आपण स्वतःचे अस्तित्व हरवतो,
चेहऱ्यावर मुखवटे चढवून
लोकांना खूश करण्यासाठी जगतो,
आणि आतून मात्र रिकामे होत जातो.

लोकांच्या डोळ्यांत दिसणाऱ्या सावल्या
आपल्या प्रकाशाला झाकू लागतात,
त्यांच्या मतांच्या जाळ्यात अडकून
आपल्या पावलांचा ठसा हरवतो,
हेच लोकभ्रमाचे गडद आभाळ.

सत्याच्या वाटेवर चालताना
गैरसमजांचे दगड अंगावर पडतात,
पण जेव्हा मनाशी प्रामाणिक राहतो
तेव्हा लोकभ्रमांचे ढग फाटतात,
आणि आत्मविश्वासाचा सूर्य उगवतो.

खरे सुख लोकांच्या शब्दांत नाही
तर आपल्या अंत:करणात दडलेले आहे,
लोकभ्रमाच्या सावल्या दूर करून
आपला मार्ग स्वतः ठरवला पाहिजे,
तेव्हाच जीवनाला खरी उजळणी मिळेल.

*महेश पुरसों काणकोणकर*
*कालापूर बांध तिसवाडी गोवा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

वास्तविकतेला दूर सारता,
लोकभ्रम तुम्ही पसरविता.
अंधश्रद्धेवर जगवून जनता,
लुटमार, फसवणूक करता.

भोळीभाबडी जनतेची मने,
खरा विश्वास तुम्हावर ठेवे.
विश्वासघात करुन त्यांचा,
सांगा बरे, काय तुम्ही मिळवे?

खोट्या औषधांच्या भ्रमान,
किती जीव घेता हातून?
सांगा बरे, जीव घालवून,
तुम्हास लाभते काय त्यातून?

मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा,
साधने गरीबाना लुटण्याची.
उघडा शाळा, दवाखाने,
सेवा करा खऱ्या गरजूंची.

विश्वास जिंका जनतेचा,
सेवा करा तिची मनोभावे.
मनुष्यजन्म पुन्हा न मिळे,
लोकभ्रम दूर करणे हवे.

*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

अंधश्रद्धा अनिष्ठ रूढी
लोकभ्रम व्याधी वाळवी
पसरी रोग भ्रमात वेडे लोक
किडं निवारूनी नष्ट करावी ||

भ्रमात विचित्र बडबडतो
भान राहत नाही कशाचे
झपाटल्यासारखे वर्तन
सुदबुद हरली मानवाचे ||

शहाण्या हुशार माणसाला
मुर्खात काढणे गैर आहे बाब
लोक भ्रमिष्ठ झालेले असावे
भलतासलता पुसती जाब ||

भ्रमनिराशेत जगतो वेड्या
डोक्यात फरक पडला का?
निकामी मेंदू अक्कल गहाण
भ्रामक खुळी गर्क बुडला का?||

जादुटोण्याचा जबर पगडा
गंडवले लपांग्या भोंदूगिरीने
कर्मकांडवादी सुधरत नाही
पवन म्हणतो ढोंगीच धुपारने ||

*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️
*लोकभ्रम*

अपयशाचे गर्द मळभ
सदाच त्यांच्या डोई…
नाव दिले होते जनतेने
ही टिम पणौतीबाई…

वर्षोंवर्षे चालला होता
अपयशाचा हाच परिपाठ…
प्रयत्न सारेच असफल,
दूर दिसेना यशाचा काठ..

साखळी सामन्यात गळ्यात,
विजयश्री पडायची…
फायनल मध्ये जाऊन
धूमसून ती रडायची…

तरीही प्रेम जनतेचे
होतेच अबाधित…
वाटे,या वर्षी तरी
व्हावी नक्कीच जीत…

कुणी म्हणे,”मल्ल्याचा
तो भ्रष्टाचारी पाप..
पनौतीच्या डोईवरचे,
धुईल कसे हो शाप..

पण, त्या वर्षी पणौतीने
कमाल भारी केली..
निंबू टीचून नाकावरती
विजयश्री घेऊन आली…

लोकभ्रम जनतेचा
सफसेल झाला खोटा…
जिथे धैर्य, जिद्द, चिकाटी
तिथे यशाला का तोटा?

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐱🐶🐱♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे