0
4
8
2
8
7
संदेश
आज नवी शपथ घेऊ
झाडे लावू झाडे जगवू
शुद्ध स्वच्छ हवा घेऊ
वसुंधरेला नटलेले पाहू
मनी नव्याने संकल्प घेऊ
पर्यावरण संतुलित ठेवू
पाणी जीरवू पाणी आडवू
शेत पिकांना हिरवे ठेवू
गाडगे बाबांचा आदर्श घेऊ
परिसर स्वच्छ सुंदर ठेवू
मुला मुलींना शिक्षण देऊ
अंधश्रद्धा बाजूला ठेवू
महामानवांना समजून घेऊ
समाज हितासाठी
संघटीत होवू एकसंघ राहू
हक्कासाठी लढत राहू
संकटात ही सोबत राहू
एक दुसऱ्याला समजून घेऊ
दानात दान ज्ञानदान
नेत्रदान रक्तदान देवू
मुलगा मुलगी भेद नको
समानतेला महत्व देऊ
आई-वडिलांचे कोटी उपकार
सदैव त्यांना काळजात ठेवू
संताचा संदेश समजून घेऊ
थोर मोठ्यांचा आदर ठेवू
समतेचे पाईक आपण
एकीचे गीत गाऊ आनंदी राहू
प्रकाश पुंडलिकराव गोधने
कंधार,जि.नांदेड
0
4
8
2
8
7



