Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्रमुंबई

जे. एस. एम. महाविद्यालयात महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

जे. एस. एम. महाविद्यालयात महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलीबाग: जे. एस. एम. महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष व अंतर्गत समिती द्वारे उच्च शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार महिला सुरक्षितता व विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती या विषयावर दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष व अंतर्गत समिती प्रमुख प्रा. वर्षा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना या कार्यशाळेचे आयोजन करण्यामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. आपल्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी महाविद्यालयाच्या अंतर्गत समितीची रचना स्पष्ट करून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या महिला सुरक्षा विषयक मार्गदर्शक तत्वांचा उहापोह केला. या कार्यक्रमात अ‍ॅड. नीला तुळपुळे यांनी महिला सुरक्षा विषयक विविध कायद्यांचा आढावा घेत विशाखा समितीची रचना व कार्य स्पष्ट केले. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व अशा प्रकारचा स्त्रियांचा प्रवास अधोरेखित करत स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व विशद केले.

सौ. शारदा धुळप यांनी वसतीगृह व्यवस्थापन व महिला सुरक्षितता याबद्दल आपले बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच समाज कल्याण विभागातील श्री राजेश म्हात्रे यांनी महिलांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध शिष्यवृत्ती तसेच योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या अ‍ॅड. नीलम हजारे उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमासाठीजे एस एम महाविद्यालयातील व अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रा. वर्षा पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. श्वेता मोकल यांनी उपस्थितांचे आभार मानले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे