
0
4
0
9
0
3
बोजारा
आज तान्हा पोळा
लाकडी नंदीबैलाचा
रंग लावु पायी काळा
साज मोरपिसांचा
नविन सुंदर कपडे
बालमंडळी नटले
टोपी डोक्यावर
नंदीबैल पोळ्यात आले
स्पर्धा वेशभूषेची
परीक्षक पाहु लागले
प्रथम क्रमांकांची
नावे जाहीर झाले
बक्षिसांची लयलूट
बोजाराही भरपूर
कॅडबरी चाॅकलेट
वही खोडरबर
असा आमचा सण
हौस मजेचा येतो
नमस्कार सर्वांना
बोजाराही ठेवतो
ज्योती चारभे
ता. जिल्हा वर्धा
=========
0
4
0
9
0
3





