0
4
8
2
9
0
काळीज
तुझ रुप गोर गोर
तुझी बावरी नजर
तुझ्या गोजीऱ्या रूपान
केल काळजात घर
झाली नजरा नजर
छेडली काळजाची तार
श्वास झाला उबदार
सांडलं प्रीतीच केशर
कशी पेलतेस सांग
हा यौवनाचा भार
हे रूप निसवलेल
तुला आलेला बहर
कानी निनादता स्वर
मनी नाचला मयूर
तुझ्या रूपाचं चांदणं
तू ग चांदवाची कोर
वाढला स्पंदनाचा जोर
सांग धरु कसा धीर
माझ्या कोवळ्या मिठीत
तुला फुटला अंकुर
स्वप्नांच्या झुल्यावर
झाल आयुष्य साकार
फुले फुलली प्रेमाची
मिलनाच्या वेलीवर..
प्रकाश पुंडलिक गोधने
कंधार. जि.नांदेड
==========
0
4
8
2
9
0



