आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
बाबासाहेब
सविता धमगाये जिल्हा नागपूर

0
5
4
1
0
2
बाबासाहेब
लावून पंख आकांक्षाचे
ती उडते उंच आभाळी
समतेच्या विचारांची साधीशी
दारी रेखाटत रांगोळी
हक्क आणि अधिकाराची
जाणिव झाली जेव्हा
लढण्याची उर्मी आली
विचारांना गती तेव्हा
कर्तव्य आणि जबाबदारी
एक सासर एक माहेर
शब्द जोखून घेते
देत सन्मानाचा आहेर
कुठून आली ही शक्ती
जाणिव हक्क आणि दाव्याची
पकडता बोट मजबूतीने
काय बिसात कुणा काव्याची
मान उपकार आतातरी
महामानवाच्या लढाईचे
आली चौदा एप्रिल आता
घे हाती ध्वज समानतेचा
साडी पांढरीच राहू दे
नको चढवू रंग अन्य कुणाचा
बुद्धम् सरनम् गच्छामी
रंग समान विचारांचा
रंग समान विचारांचा
सविता धमगाये
जिल्हा नागपूर
0
5
4
1
0
2



