Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

क्रीडा भारतीच्या विविध क्रीडा केंद्रांची स्थापना

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 9 0

क्रीडा भारतीच्या विविध क्रीडा केंद्रांची स्थापना

मल्लखांब, क्रिकेट,कबड्डी खेळांचे प्रशिक्षण

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे.दि.26 ( प्रतिनिधी) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि क्रीडा भारती पुणे महानगर यांनी संयुक्तपणे म.ए.सो.मुलांचे भावे हायस्कूल क्रीडांगणावर नव्याने खेळाचे केंद्र सुरू केले असून त्याचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ सदस्य व क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ हे उपस्थित होते. या क्रीडा केंद्रामध्ये मल्लखांब, क्रिकेट व कबड्डी या खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

कार्यक्रमात सुरवातीस मल्लखांब खेळाची प्रात्यक्षिके सहकार नगरच्या SVM अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. प्रास्ताविकामध्ये क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष विजय पुरंदरे यांनी केंद्राची भूमिका मांडली. प्रमुख पाहुणे विजय भालेराव यांनी आपल्या मनोगतामधून खेळांचे महत्वं सांगून विद्यार्थ्यांचा यातून सार्वांगीण व्यक्तीमत्वं विकास घडतो, असे मत व्यक्त केले.

सूत्रसंचालन संपर्क प्रमुख विजय राजपूत यांनी केले. क्रीडा भारतीचे सहसचिव भाऊसाहेब खुने यांनी आभार मानले. क्रीडा भारती पुणे महानगराच्या वतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथील महिलाश्रम हायस्कूलमध्येही अशाचप्रकारे नवे क्रीडा केंद्र स्थापन करण्यात आले असून विशेष म्हणजे लहान मुलांसाठी बाल क्रीडांगणही सुरू करण्यात आले आहे. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवी देव आणि सहसचिव प्रदीप वाजे यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले.

दिव्यांग कल्याण केंद्र, वानवडी,पुणे येथे क्रीडा भारतीच्या वतीने शुटींग रेंज नुकतीच सुरु करण्यात आली. अशाचप्रकारे विविध मैदानावर क्रीडा केंद्र सुरु करणार असल्याचे क्रीडा भारतीचे अध्यक्ष, शैलेश आपटे यांनी यावेळी सांगितले.

अर्जुन पुरस्कार विजेत्या पुणे महानगर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, मल्लखांब खेळाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते सत्यजित शिंदे, तसेच आशिष वैद्य,स्वाती बेने, दिपक मेहेंदळे, योगीराज टाकले, सुवर्णा मांढरे, कृष्णा काळे, हरिश अनगोळकर, अनुजा दाभाडे असे खेळाडू व खेल प्रशिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे