
0
6
2
9
2
1
सुखी माणसाचा सदरा
सुखी माणसाचा सदरा
जरा परिधान करून पहा
कशाला सारखे सारखे
फक्त विवंचनेत रहा
सुख आपल्या जवळच आहे
याची जाणीव होत नाही
तोपर्यंत दुःख कधीही
आपली पाठ सोडत नाही
ओठावरचे स्मित हास्य
दिसू द्या सर्वांना खुलून
किती दिवस असे बसणार
फक्त दुःखालाच गिळून
सुख शोधावे नित्य
दुःख बाजूला सारून
घ्यावा मोकळा श्वास
जगावे जीवन भरभरून
नाही महाग हा सदरा
सुखी माणसाचा बरे
परिधान करता त्यासी
दिसते व्यक्तिमत्व साजिरे
पांडुरंग घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
0
6
2
9
2
1



