0
4
8
2
9
4
रंग वसंताचे
पंचम स्वर नभात भरले
आला सुगंध भान हरपले
आम्रतरूवर मोहर फुले
भ्रमर गुंजारव सुरात चाले
पवन बावरा होत कावरा
भिरभिर एकटाच फिरे
उंच उडवित पाला पाचोळा
सांगे सोबती घ्या मला रे
निबीड रान कसे अचानक
लाल केशरी रंगात न्हाले
तांबट कोकीळ बुलबुल सारे
पंख पसरीत तरुवर आले
कुठे भांडण कुठे लळा
वसुंधरेचा रंग आगळा
गंध मातीचा घेऊन फिरतो
वात होतो गंधात बावळा
रंग वसंताचे चहुकडे
प्रितीचा ऋतू भुरळ पडे
उडे आकाशी गुलाल गुलाबी
हृदयी प्रणयाचा बंध जडे
सविता धमगाये
जि नागपूर
========
0
4
8
2
9
4



