0
4
8
2
8
7
आज बोलू या
हलके हलके बोल जराशी
गुपीत मनातील खोल जराशी
उगा कशाला रुसवे फुगवे
खुलू दे जरा कळी गालाशी
नको लपंडाव सांजवेळी भेटू..
या हृदयीचे त्या हृदयी थाटू
आज बोलू या खुल्या मनाने
आणि सुखाचे शिखर गाठू..
सोडवूनी मौनातले बोल
सोड मनाची चलबिचल
तिथे प्रीत फुलवू दोघांची
नवा बांधूया प्रितमहल….
चिंब होवू दे मनमयूर
नभालाही होवू दे खबर
बरसेल तोही सरी होवून
हवाय पाऊस देहभर….
अजिंठा जरा वाचून घेवू
पाऊलखुणा शोधून घेवू.
तुझ्या अन् माझ्या श्वासांचे
बिंदू सारे जोडून घेवू..
इथेच सजनी थांबू आता
देह गुंतला गाता गाता
श्वास उसवले, स्पप्न रंगले
स्वर्ग लागला अवचित हाता !
स्वर्ग लागला अवचित हाता!
सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली
===========
0
4
8
2
8
7



