कवितानागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध
खोपा; प्रांजली जोशी
0
4
8
2
9
3
खोपा
सुगरणीची करामत
खोपा सुंदर विणला
बघा पिल्लांसाठी तिने
खोपा झाडाला बांधला
उंच झाडाला टांगून
रक्षण पिल्लांचे करतो
ऊन, वादळ, पावसातही
खोपा टिकून राहतो
एका चोचीने बांधते
सुगरण आपलं घरटं
बघ माणसा तिचे
प्रयत्न अन् कष्ट
कमालीची ध्येयवादी
किती चिकाटी अंगी
खोपा विणते मजबूत
असा दुजा नाही जगी
सौ.प्रांजली जोशी
विरार, पालघर
===========
0
4
8
2
9
3



