0
4
8
2
9
4
नवी उमेद
अरे अरे बळीराजा
नको असा खेद करु
अवकाळीच्या फेऱ्याने
जिद्द तुझी नको हारु!
गारपीटीचा तडाखा
उभ्या पिकाला बसला
हातातोंडाशी आलेला
घास हिरावून नेला!
सरे वैशाख वणवा
येती वळवाच्या सरी
पुन्हा जोमाने पेरण्या
धर पाभर तू करी!
उभ्या जगाचा पोशिंदा
भिजे कष्टाच्या घामानं
काळ्या आईच्या कुशीत
पीक येईल जोमानं!
आता उठ बळीराजा
नको हताश रे होऊ
नव्या उमेदीनं पुन्हा
गाणं शिवाराचं गाऊ!
सौ.सुनिता नाईक
कुरुळी,जि.पुणे.
========
0
4
8
2
9
4



