0
4
8
2
9
3
झिजलेला देह
वृद्ध मायबापाचा, करा सांभाळ
नका धाडू,त्यांना वृद्धाश्रमात,
साक्ष देतो,त्यांचा झिजलेला देह
किती खाल्या,असतील खस्ता वाढवण्यात?
स्वतःच्या इच्छा अपेक्षाला
सदैव मुरड घातली असेन,
फाटकंच,तरी,पण पुन्हा शिवून
तेच, नव्यानें घातलं असेन.
तुम्ही पोटभर जेवावे म्हणून,
भूक नाही,असे सांगितले असेन,
कसं ठकवलं? पोराला म्हणत
समाधानाने पोट भर लं,असेन.
तुमच्या उच्चशिक्षणासाठी
पैश्याची उधारउसन वारी,केलीच असेन,
सावकाराचे पैसे फेडण्यासाठी
पोटाला चिमटा काढलाच असेन.
मायबापाचे परिश्रम फळास,आले
मोठी नौकरी, मान सन्मान मिळाला,
आता,लाज त्यांची वाटतेय म्हणून
वृद्धाश्रमाचा रस्ता, कां दावला?
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
0
4
8
2
9
3



