
0
6
2
9
0
4
काना मात्रा
एकदा पुस्तकाच्या गावात
भरली अक्षरांची जत्रा
जत्रा पाहायला आले
वेलांटी सोबत काना मात्रा.
वेलांटी बाई लाजरी
घेतला पदर डोईवर
मात्रा घालून फेटा
गोंडा शोभे माथ्यावर .
आकाश पाळण्यात बसले
गोल गोल फिरले
एकमेकावर आपटले
यात्रेत हरवले .
पहिलीची मुले हुशार
धरून आणले कान्याला
जोडले अक्षराला
दादा मामा काका झाला.
मात्रा आणली शोधून
दिली अक्षरावर ठेवून
जमले नेने लेले पेशवे
म्हणे कुठे जाता पळून.
विमल धर्माधिकारी
ता.वाई, जि. सातारा
0
6
2
9
0
4



