0
4
8
2
9
3
हास्य तुझ्या चेहऱ्यावर
गोड हसू गालावर खेळत
हास्य तुझ्या चेहऱ्यावर दिसत
गाल गुलाबी दोन किती सुंदर
हसताच कळी गालावर वसंत
क्षण सुखाचा तुझ्या डोळ्यात
प्रेम बंधाने नाहून निघतो
गंध दरवळला जीवनी फुलला
दाही दिशा कीर्ती आनंदाने बहरतो
वाढदिवसाच्या शुभ क्षणी
लाभो उदंड आयुष्य निरामय
यश ,कीर्ती ,धन ,मान वाढवावा
हीच प्रार्थना ईश्वरमय
हास्यखुले जरी तुझे ओठावर
दिसतेस तू सौंदर्याची खाण
मानवास देशील तू साथ
राक्षिल तू या सौंदर्याचा माण
उदंड आयुष्य सुखमय जावो
नव नवसाहित्य उदयास येवो
साहित्य दर्पण कला मंच कडून
सदैव यश संपादन मिळत जावो
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
=============
0
4
8
2
9
3



