0
4
8
2
9
7
चित्रमित्र
कलाकृती रेखितो
कुंचला फिरवितो
सहज रम्य चित्र
काढीतो चित्रमित्र।।१।।
निसर्ग साकारतो
पानं, फुलं, पाखरं
भेटती नवे मित्र
आवडी चित्रमित्र।।२।।
डोंगर सजवितो
झाडे हिरवीगार
वेली ही गारेगार
चित्र बहारदार।।३।।
नदी ओढे झरेही
पाणीदार रंगतो
काढी कौलारू छत्र
चित्राशी करू मैत्र।।४।।
देई संदेश चित्र
व्होऊ निसर्गमित्र
झाड लावू या मित्रा
सांगतो चित्रमित्रा।।५।।
सृष्टीचा चित्रकार
निसर्ग कलावंत
रंगारी चित्रमित्र
होऊनी बालमित्र।।६।।
देखावा अप्रतीम
रेषाकृती बोलक्या
चित्राकृती कविता
होऊनी कवीमित्र।।७।।
गणेश नरोत्तम पाटील
ता.शहादा जि.नंदुरबार
==========
0
4
8
2
9
7



