सिध्दीविनायकाच्या हृदयावर सजले सारस बागेच्या तळ्यात उमललेले शुभ्र कमळाचे फुल
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
सिध्दीविनायकाच्या हृदयावर सजले सारस बागेच्या तळ्यात उमललेले शुभ्र कमळाचे फुल
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: दि.6डिसें: (प्रतिनिधी) : “तळ्यातला गणपती” म्हणून प्रसिध्द असलेल्या पुण्याचा सारसबागेतील सिध्दी विनायक म्हणजे पुणेकरांचे लाडके आराध्य पावन दैवत. पेशवेकाळात तळ्यात बांधलेल्या या भव्य मंदिरात विराजमान बाप्पाच्या लोभस मूर्तीचे दर्शन घेण्याचा इथल्या कित्येक लोकांचा नित्यक्रम आहे. याच तळ्यात सध्या उमललेली शुभ्र कमळ फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यातीलच एक पूर्ण उमललेले टप्पोरे शुभ्र कमलफूल आज सिध्दीविनायकाच्या हृदयावर सजले असून बापाची देखणी मूर्ती अधिकच विलोभनीय दिसत आहे.
नुकत्याच राज्यात झालेल्या निवडणुकीत जनतेनेही असेच कमळ फुलवले असून नव्या राज्याचा शपथविधी पार पाडला, त्या योगायोगाचीही चर्चा या निमित्त तळ्यातल्या गणपती परिसरात रंगली आहे.



