0
4
8
2
9
0
अर्धांगिनी
संसार रथ सारथी
गृहलक्ष्मी असे घराची
कर्तव्य बजावी निरंतर
करी लयलूट प्रेमाची
देई मायेची सावली
दारी आनंद उधळण
चढ उतार आयुष्यात
घाली सुख पखरण
परवा नसे स्वतःची
सदा चिंता कुटुंबाची
सेवा निष्ठेने तत्पर
धुरा सांभाळली संसाराची
जगण्याची कसब शिकवी
अर्धांगिनीमुळेच चैतन्य उभारी
संसारात कला चातुर्य दाखवी
पाठबळ स्वप्नांची घेऊन भरारी
अर्धांगिनी जिवाभावाची
देई घराला घरपण
स्थान जीवनात अनमोल
बांधी सुखाचे तोरण
करू आदर सन्मान
कार्य जीवनी बहुमोल
स्वामिनी कणा घराचा
जाणू सदैव तिचे मोल
अर्चना राजू ईंकने
लाखांदूर,भंडारा
0
4
8
2
9
0



