Breaking
कविताछत्रपती संभाजीनगरमराठवाडासाहित्यगंध

कौतुकालय

विष्णू संकपाळ बजाजनगर, छ. संभाजीनगर

0 6 2 9 0 4

कौतुकालय

इथे प्रत्येक माणसाला
कलाकारी जमत नसते
मात्र रसिकराज बनणे ,
सहजच संभव असते.. .//

सच्चा कलाकाराला,
हवा असतो लोकाश्रय
म्हणून दर्दि रसिकांचे,
हवे एक कौतुकालय.//

जेव्हा वाह क्या बात है,
ही मिळते उत्स्फूर्त दाद
तेव्हाच त्या कलेलाही
लागून जातात चार चांद… //

शाबासकीची एक थाप,
अमाप प्रेरणेचे बळ देते
याच स्फुरण मंत्राने मग
प्रतिभा नभात झेप घेते..//

रसिकांची टाळी जणू
बँक आँफ समाधान
व्याजच सरत नाही,
मुद्दल तसेच आबादान..//

विष्णू संकपाळ
बजाजनगर, छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे