
0
6
2
9
0
4
सारवा सारव
सारखा प्रश्न पडतो एक
इकडची तिकडे करतांना
कुठली मजा वाटते
कुणास ठाऊक बोलतांना
वाद जेव्हा इरेला पेटतो
तेव्हा मात्र प्रश्न पडतो
आता आपल्यावर शेकणार
हत्ती जाऊन शेपटीला अडतो
मग करायची सारवासारव
असं नव्हतंच म्हणायचं मला
चुकून अर्थाचा अनर्थ झाला
सावळा गोंधळ भूतान केला
माझी आपली नियत साफ
नाही हो द्यायची कुणाला ताप
अशी कशी जीभ घसरली
झालाय सगळा मात्र संताप
पुन्हा असे होणार नाही
हवे तर धरते दोन्ही कान
गोष्ट आता इथेच संपवा
असू द्या थोडी मनाला जाण
सविता धमगाये
ता. जिल्हा नागपूर
========
0
6
2
9
0
4



