0
4
8
2
9
0
प्रेमवाणी
बरसता प्रेमवाणी
जुळतात सुराला सुर
जीवनात वाहू लागतो
सदा आनंदाचा पूर
प्रेमवाणीचे उगमस्थान
हृदयात वसले असावे
कळत नकळत मिटती
संबंधातील दुरावे
मुखातून निघता बोल
वाहावा प्रेमाचा झरा
चित्त होई शांत,प्रसन्न
आत्मिक आनंद खरा
जुळतात मनाला मने
वाढत जातो गोतावळा
शब्द असे मधमिश्रीत
वाटे ऐकताना लळा
निर्मळ,शुद्ध भावातून
शब्द घेती आकार
सात्विक तेजाची झालर
होते मुखातून साकार
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
8
2
9
0



