मोहपा येथे चित्रशाळा उन्हाळी शिबीराचा समारोप
मोहपा येथे चित्रशाळा उन्हाळी शिबीराचा समारोप
मोहपा येथे चित्रशाळा उन्हाळी शिबीराचा समारोप
मोहपा : (प्रतिनिधी )नालंदा फाईन आर्ट,मोहपा द्वारा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित पंधरा दिवसीय चित्रशाळा उन्हाळी शिबीर समारोपीय समारंभ न्यू इंग्लिश हायस्कूल,मोहपा येथे उत्साहात संपन्न झाला.नालंदा फाईन आर्टचे संचालक तथा आयोजक कला शिक्षक हर्षदीप रंगारी यांनी विद्यार्थ्यांना पंधरा दिवस चित्रकले विषयी मार्गदर्शन केले.
समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शमसुद्दीन शेख,तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य अरूण सोमकुवर,प्रकाश आदमने,प्रदीप विघ्ने, संजय माकोडे, आनंदराव वासनिक, गौतम जांभूळकर, सत्येश्वर यावलकर,स्वाती हिरटकर,बापूना मांडवकर,श्रीराम रंगारी,कला शिक्षक रोहन पाडाडे,वैष्णवी शिरभाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षदीप रंगारी यांनी केले.शमसुद्दीन शेख,अरूण सोमकुवर,प्रदीप विघ्ने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.शिबिरासाठी प्रफुल पोतले यांचे सहकार्य लाभले.शिबिराचे प्रायोजकत्व अरूण सोमकुवर,प्रकाश आदमने,शमसुद्दीन शेख,प्रदीप विघ्ने, संजय माकोडे,आनंदराव वासनिक, बापूनाजी मांडवकर,श्रीराम रंगारी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीराम रंगारी यांनी केले.कार्यक्रमास विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

