Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकण

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये महामानवास अभिवादन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये महामानवास अभिवादन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.

सर्व प्रथम मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर व जेष्ठ शिक्षक कैलास शिकारे सर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला व प्रतिमेचे पूजन केले. तसेच उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सुनिल मोरे सर व उपस्थित सर्वांनी त्रीसरण – पंचशील म्हटले.

याप्रसंगी मुख्याध्यापक / प्राचार्य आनिल दारकुंडे सर, दत्तात्रय अहिरे सर, सचिन भंडारे सर, आशिष राणे सर यांनी आपल्या भाषणातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगितली.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक समिती प्रमुख अजित नाईक सर यांनी तर आभार प्रदर्शन धनराज फड सर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे