Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

बघून घेवू

विष्णू संकपाळ बजाजनगर

0 4 8 2 9 7

बघून घेवू

बर्‍या वाईट कर्माचे
भोग चुकत नसतात
एक दिवस बघून घेवू
मूकपणे सांगत असतात.. //

पाप आचरण करताना
परिणामाची पर्वा नसते
पुढचे पुढे बघून घेवू
अशीच धारणा असते.. //

सर्व जगाची दिशाभूल
जरी सहज करता येते
मात्र अपराधाची जाण
सतत अंतर्मन करून देते.. //

सारासार विवेक बुद्धी
कदापी गहाण पडू नये
पापाचे पारडे जड होईल
असे कर्म हातून घडू नये.. //

जसे पेरावे तसे उगवते
हीच निसर्ग रीत कायम
तसेच मिळते कर्म फळ
नियतीचा अटळ नियम…//

विष्णू संकपाळ बजाजनगर
जि.छ. संभाजीनगर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे