0
4
8
2
9
0
स्पर्श विश्वासाचा
गर्भगळीत होईल मी
नका खेळू भावनेशी
करा सांत्वन दुःखाचे
विचार जुळवा मनाशी
बुडत्याला द्या आधार
सहानुभूतीच्या शब्दांचा
खांद्यावरी हात टेकवता
कळेल स्पर्श विश्वासाचा
आपल्यानी छळले मज
प्रतिसाद दिला परक्यानी
फुंकर ममतेची जखमांवर
घातली मित्रपरिवारांनी
दानवासम नको वर्तन
पाळ माणुसकीचा धर्म
संतपरंपरेची शिकवण
घे जाणून त्यातले मर्म
स्पर्श विश्वासाचा आरसा
येते दिसून त्यातून कर्म
वसुंधरेवरचा जीव सजग
अविश्वासाचा नको अधर्म
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
4
8
2
9
0



