Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

बाप्पाशी संवाद ‘एकपात्री लेखन’

वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि.पुणे.

0 6 2 8 1 0

बाप्पाशी संवाद ‘एकपात्री लेखन’

॥ श्री गणेशाय नमः ॥
बाप्पा…! अरे गणपती बाप्पा. किती दिवस वाट पाहत होते रे तुझ्या आगमनाची. आज तू आलास…! तुझ्या येण्याने घरात आनंद आला. घर स्वच्छ झाले. गल्लीमधे मुलाबाळांचा उत्साह वाढला. सगळीकडे रोषणाई झाली, लाईट माळ लागली ढोल-ताशे वाजू लागले. मजा आहे बाबा तुझी. पण बाप्पा… एक विचारू? तू खरंच आलास का रे? कारण तुझी मूर्ती तर घराघरात आली, पण तुझ्यातली माणुसकी मला तर दिसेना, तुझ्यातली संवेदनक्षम विचार दिसेना. असं का झालं रे?

तुझ्या कानावर मोठमोठे आवाज पडतात ना बाप्पा? डीजेचे, फटाक्यांचे, घोषणांचे. पण कधी एखाद्या गरीब कुटुंबाचा लाचारीसाठी दबलेला आवाज ऐकू येतो का रे? हल्ली मुली,बायका सुरक्षित नाहीत रे. त्यांच्या वर अत्याचार होतोय त्यांची किंकाळी ऐकू येते का रे? अरे समाज एवढा बिघडलाय की तोंडात शिव्या आणि हातात हत्यारे असे चालू आहे. जरा समजावून सांग रे या सर्वांनाच. माणुसकीची जरा शिकवण दे. चांगले विचार दे. नम्रता शिकव. अबालवृद्ध यांची काळजी घ्यायला शिकव. तस पाहिले तर या गोष्टी का शिकवाव्या लागतात रे. माणूस बदललाय. माणुसकी संपत चाललीय. नको बाप्पा असे पहायला लावू. परत शांतीचे, समतेचे, समृद्धीचे राज्य या वसुंधरेवर घेऊन ये.

“बाप्पा, माझ्या बाबांना काम काम मिळू दे. मला काम मिळू दे,” अशी वाक्य कानी आली तर त्यांना काम दे बरका. त्यांच्या आवाजाला हाक दे…! कधी एखादी मुलगी जर बोलली की “बाप्पा, मला खूप शिकायचंय… मला उंच भरारी घ्यायची आहे. माझ्या कुटुंबाला साथ द्यायची आहे ” तेव्हा तिच्या स्वप्नांना तू नक्की बळ दे बर. बाप्पा…आम्ही तुझी 10 दिवस पूजा मनोभावे करतो. कोणी 5 दिवस करतो. कोणी अगदी दीड दिवस तुला घरी आणतो. पण सर्व भक्ती रसात बुडून जातात. आम्ही तुला मोदक देतो. लाडू देतो. गोड नैवेद्य देतो. तुझ्या आवडीचे फुलं वाहतो. पण तुझ्या शिकवणीचा एक छोटासा प्रसाद मात्र विसरतो.

तू माणूसकी शिकवली.एकोपा शिकवला. उत्साह शिकवला.एकत्र येऊन कार्य करायला शिकवलं पण सर्व शिकवण माणूस विसरत चालला आहे.तू बुद्धीचा देव आहेस ना. मग आमची बुद्धी कुठे दुसरीकडे चालली बाप्पा.. मुले परीक्षेत कॉपी करतात.वरचे लोकं लाच देताना खोटं बोलतात. दुसऱ्याला फसवतात.जात-पात, धर्म, भाषा यावरून माणसामाणसांत भिंती उभ्या करत आहेत… हे सर्व थांबवा हो बाप्पा.. सगळीकडचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार थांबायला हवा. बाप्पा… तुझं वाहन एवढंसं उंदीरमामा आणि तरी तू एवढ्या मोठ्या जगाला सांगतो की अहंकार कितीही मोठा असला, तरी नम्रता त्याला जिंकू शकते. पण आम्ही? आम्ही तुझी मूर्ती बदलतो. सजावट बदलतो.मिरवणूक सुद्धा बदलतो. पण स्वतःचा स्वभाव काही बदलत नाही. अगदी थोडी माणसे आहेत स्वतःचा स्वभाव बदलतात.

बाप्पा ऐक ना थोडं माझं. यावर्षी मला तुझ्याकडे काही मागायचंच नाही. फक्त एक दे… चांगलं मन दे. दुसऱ्याच्या दुःखात धावून जाण्याची संवेदना दे. चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्याचं धैर्य दे. आई-वडिलांचा आदर करण्याची बुद्धी दे. निसर्गाची काळजी घेण्याची जाणीव दे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, माणसाला माणूस म्हणून पाहण्याची कला दे. माणुसकीच्या चार गोष्टी समजते ना घ्यायला शिकव. बाप्पा… तुझं विसर्जन हे होणारच आहे. ढोल ताशांच्या गजरात तुला निरोप दिला जाईल. तुझी मूर्ती मोठ्या टाकीमध्ये नदीमध्ये, समुद्रामध्ये विसर्जन केली जाईल.

पण एक उपाय सुचला..! कसा वाटतो बघ तुला पटला तर… प्रत्येक घराघरातील छोट्या मोठ्या तुझ्या ज्या मूर्ती आहेत; त्या मूर्ती विसर्जन करण्यापेक्षा पाण्यातून काढाव्यात आणि त्या एका एका संघटनेला द्याव्यात अशी संघटना कि ती संघटना या मूर्तींचा पुनर्वापर करेल. यातून काय होईल पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही. हानी होणार नाही. आणि मूर्त्यांचे पावित्र्य जपले जाईल. तसेच पुढच्या वर्षी त्याला रंगरंगोटी देऊन त्या मूर्तींचा पुनर्वापर केला जाईल. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत. बघ बाप्पा पटलं तर…. बाप्पा माझे सर्व विचार तू ऐकून घेतलेस खूप खूप धन्यवाद रे…. बाप्पा – तथास्तु.
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या….!!

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे.
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 8 1 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे