Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रसाहित्यगंध

माझे बाबा

साधना जनार्दन भट्टगांवकर. कणकवली, सिंधुदुर्ग

0 4 8 2 9 0

माझे बाबा

आज एक सूर्य कायमचा अस्ताला गेला.
कोणत्या लोकी शोधू बाबा पुन्हा कुठे भेटाल मला.

परमेश्वराने दिले होते मला अनमोल रत्न
पुन्हा ते मिळण्यासाठी कोणता करू यत्न.

बाबा तुम्ही होता आपल्या कुटुंबाचा कणा
तुमचा विरह कसा समजावू माझ्या मना.

प्राणापेक्षा शेतीवर अतोनात केली माया..
घासभर जेवणासाठी झिजवली तुम्ही काया.

आयुष्य भरले अडचणीनी तरी दुःख नाहीं केले
देवही हरला फळ देण्या तरी कष्ट नाहीं सोडले.

संपत्तीने तूम्हा कधी दिली नाहीं साथ
तरी स्वाभिमानाने तुम्ही केली गरिबीवर मात.

तपस्या अन् त्यागाने जीवन केले धन्य
परमेश्वरी सेवा करुनी मिळविले महत पुण्य.

विनोदी स्वभावाने जीवनात आणले हास्य
लहानग्यांच्याही मनातले झालात तुम्ही सदस्य.

तुमच्याकडून मला मिळाली जगण्याची प्रेरणा
त्याच प्रेरणेतून समृद्ध करेन माझ्या या जीवना.

आठवण बाबा प्रत्येक क्षणी तुमची च मनी
वाट पाहतोय सारे या बाबा माघारी

धोतर, शर्ट, टोपी, पिशवी अन कुंकू माथ्यावरी
जणू शोभे वारकरी
या पोशाखे तुम्ही परतुनी या हो पुन्हा भूमीवरी
बाबा, पुन्हा भूमीवरी..

साधना जनार्दन भट्टगांवकर.
कणकवली, सिंधुदुर्ग

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे