
0
6
2
9
2
0
उंबरठ्यावरचा निरोप
जन्म झाला आईबापाच्या पोटी
फुलाचा वर्षावात घरात प्रवेश
हात धरून शिकवलंय
लहानाची मोठी त्याच्या सहवास
काबाड कष्टातून शिकवलंय
आठवणीचा साठा बालपणीचा
सोडून सुख दुःखात सहभाग
माझ्या बालपणीच्या संघर्षाचा
लग्न ठरल्या वराडी जमले
शुभमंगल सावधान झाले
मनी आनंदी आनंद झाला
निरोप द्यायची वेळ झाली
उंबरठ्यावर निरोप देताना
घेऊन शिदोरी संस्काराची
माहेराला निरोप देताना
झालीया द्विधा आज मनाची
सासरचा उंबरठा ओलांडला
जबाबदारी मायेची शिदोरी घेऊन
बदलाचा अर्थ समजला
सासरी माया प्रेम देऊन
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
=======
0
6
2
9
2
0



