0
4
8
2
8
6
माहेर
माझे माहेर वसते
गर्द हिरव्या झाडीत
जाता सरळ रस्त्याने
मन धुंद पालवीत—१
माता रेणुका मंदिर
माझ्या माहेरची शान
पूजा अर्चना करती
लोकंभजती मनानं–२
माझ्या माहेरात वाहे
नदी बेंबळा पवित्र
पाणी मिळते शेतीला
पिके जमिन सर्वत्र—३
मन झुरते नित्यची
माहेराला जाण्यासाठी
आईबाबा देवाघरी
भाऊ राही उभा पाठी—४
वारा घालतसे पिंगा
त्याला सांगते कळव
सुखी तुझी ताई दादा
नको चिंता माझ्यास्तव—५
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
8
2
8
6



