
0
4
8
2
9
7
हवालदिल
चिंन चीन दुपारी,
आलं आभाळ भरुन
वढाळ मना परी,
गेलं वावर फिरून….१
उतरतीच उन्ह,
सावल्या गेल्या दूर
एकटंच झाड उभं
रानभर….२
हवालदिल झालं मन
पाहून सुक्याची वरात
मुका झाला वारा
आलं मिरुग संपत….३
डोळा उन्हाच कुसळ
भुईला आले फोड
ओलिताची ही हूल
पाडी आतड्याला पिळ….४
वांझ घोषणाचे वाजे
जसे गल्लोगल्ली भोंगे
तसे कोरड्या नभाचे
इथे आभासी वादे…..५
काशिनाथ पैठणकर(नगरसुल)
ता.येवला.जि.नाशिक
0
4
8
2
9
7



