कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
एक होती रुसुबाई; पोपट म्हस्के
0
4
8
2
9
3
एक होती रुसुबाई
रुसूबाई गेली कोपऱ्यात
खात बसली एकांतात
तिकडून आला दादा
दादाशी तिने केला वादा
तू माझ्यासारखा बोल
तुला देईन त्याच मोल
एवढ्यात आली ताई
दोघांना डोळ्यांनी पाही
ताईने केली आयडिया
दादाला तिच्यापासून फोडूया
ताईनी आणले जामून
तोंडाला पाणी सुटले पाहून
दादांनी पार्टी बदलली
दादा ताई एक झाली
रुसूबाईला आला खूप राग
तिने केला जामून त्याग
रुसूबाई रुसु कोपऱ्यात बसू
पाहून तिला गालामध्ये हसू
पोपट सुखदेव मस्के
तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर
0
4
8
2
9
3



