Breaking
ई-पेपरकविता

चला गाऊन तर बघू या

पल्लवी पाटील

0 4 8 3 0 0

चला गाऊन तर बघू या…!!

ऐकला का हट्ट नवा? रामाला ग चंद्र हवा चंद्र हवा !

कौसल्येच्या मांडीवरती राममूर्ति ग खेळत होती रम्य आणखी अवतीभवती पसरली होती ती पुनवा

खेळतखेळत खिडकी मधुनी चंद्र पाहिला युवराजांनी त्यास भासला दिवाच दुरुनी चमचमणारा तो फसवा !

काय तरी हे अघटित बाईं चंद्र कसा हाताला येइ बाळ कुणाचे ऐकत नाही महाराजांना जा कळवा !

कुणि समजवा बाळाला या थकल्या त्याच्या तिन्ही आया दमल्या साऱ्या दासी-दाया फूल पुन्हा हें कुणि फुलवा

रामानी आकांत मांडिला चतुर मंत्री सुमंत आला समजाविल तो या रामाला त्यास वाट द्या बाजूस व्हा

अहा पहा ग आरशांतला चंद्र पाहुनी राम हांसला साखर वाटा जा नगरीला प्रजाजनांना जा हसवा

रामाला ग चंद्र दिला चंद्र दिला !

गीत – श्रीनिवास खारकर
स्वर, संगीत – गजानन वाटवे
गीत प्रकार – राम निरंजन, भावगीत

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे