Breaking
ई-पेपरकवितानागपूरनांदेडमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

बाप्पाचा आशीर्वाद

बळवंत शेषेराव डावकरे

0 4 8 2 9 3

बाप्पाचा आशीर्वाद

मन प्रसन्न होई माझे
दर्शन घेता सुखकर्त्याचे
निश्चल होतसे जगणे हे
ढग ओसरती निराशेचे

बाप्पाचा आशीर्वाद संगत
नसे भय भीती न शंका
निर्विकार तो गजमुख
आद्यपुजेचा मानाचा डंका

बाप्पा तुझं येणं म्हणजे
जणू सालभराची शिदोरी
नाम स्मरुण पोशिंदा
खातो कष्टाची भाकरी

बाप्पा कृपादृष्टी असू दे
माझ्या बळीराजावर
भाव मिळू दे मालाला
सोसावी किती परवड

ढोलताशांच्या गजरात
मिरवणूक तुझी काढू
सद्बुद्धी दे तरुणाईला
सुसंस्कारात आम्ही वाढू

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे