Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूर

महावाचन निबंध उपक्रम स्पर्धेत विद्यार्थ्यींनी कु. वेदिका सहारे दुसऱ्या स्थानी

रजत डेकाटे प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

महावाचन निबंध उपक्रम स्पर्धेत विद्यार्थ्यींनी कु. वेदिका सहारे दुसऱ्या स्थानी

रजत डेकाटे प्रतिनिधी
भिवापूर/ मालेवाडा

भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी महावाचन निबंध उपक्रम स्पर्धेत, कु. वेदिका सहारे हिने दुसऱ्या स्थानाचा मान डोक्यावर घातला आहे. ही स्पर्धा शिक्षणाच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक अभिरुची जागृत करण्यासाठी समग्र शिक्षा, स्टार प्रकल्प अंतर्गत भिवापूर पंचायत समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती.

ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलात्मक आणि साहित्यिक क्षमता प्रदर्शित करण्याची संधी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली.

त्यात मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी कु. वेदिका मोरेश्वर सहारे हिचा भिवापूरचे गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के यांनी पुस्तकांचा संच देऊन तिचा गौरव केला .

कु. वेदिका ही मालेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग पाचवीची विद्यार्थीनी आहे.
कु. वेदिका सहारे हिने दुसऱ्या स्थान प्राप्त केल्याबद्दल सांगितले, “की ही स्पर्धा माझ्यासाठी एक अनमोल अनुभव होती. माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठिंब्याने मी हे यश साध्य करू शकले. या स्पर्धेने मला माझ्या लेखन कौशल्याचा विकास करण्यात मदत झाली.

या स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक आणि कलात्मक अभिरुची जागृत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शाळांमध्ये अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, ज्यामुळे ते भविष्यातील नागरिक म्हणून अधिक सुसंस्कृत आणि जागरूक बनतात.

शाळेतील मुख्याध्यापिका शिला रोडे,शिक्षक सुरज येल्ले, शिक्षिका वर्षा चापले,वर्षा कश्यप,भुमेश्वरी सातपुते यांनी वेदिकाच्या वाचनाचे कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे