Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भ

‘मिस आणि मिसेस महाराष्ट्र 2026’ साठी राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे चौथे ऑडिशन उद्या

मिस आणि मिसेस महाराष्ट्राच्या रंगमंचावर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील करणार रॅम्पवॉक !

0 5 4 1 0 2

‘मिस आणि मिसेस महाराष्ट्र 2026’ साठी राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे चौथे ऑडिशन उद्या

मिस आणि मिसेस महाराष्ट्राच्या रंगमंचावर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील करणार रॅम्पवॉक !

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मडीया

नागपूरः(दि १० एप्रिल) महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘स्मृती एन्टरप्रायजेस’ तर्फे आयोजित ‘द ज्वेल वन पेजेंटः मिस आणि मिसेस महाराष्ट्र २०२६’ या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे चौथे ऑडिशन नागपुरात उद्या शनिवार, ११ एप्रिल रोजी खामला येथील ‘अर्जुना सेलिब्रेशन हॉल’ मध्ये सकाळी १० वाजेपासून हे ऑडिशन्स घेण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांनंतर आता नागपूरमधील १८ ते ५५ वयोगटातील महिला व युवतींना त्यांचे टॅलेंट दाखवण्याची सुवर्णसंधी स्मृती एन्टरप्रायजेसने उपलब्ध करून दिली आहे.

या ऑडिशन्समधून निवडल्या जाणाऱ्या मॉडेल्स थेट ग्रँड फिनालेसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेचे जज म्हणून बालगंधर्व पुरस्कार विजेते आशिमिक कामठे, आंतरराष्ट्रीय कोरिओग्राफर जयेश पाटील आणि मिस इंडिया हेरिटेज सौम्या नायर उपस्थित असतील.

या स्पर्धेमध्ये विवाहित आणि अविवाहित स्त्रिया सहभाग घेऊ शकतात अंतिम फेरीमध्ये मिस आणि मिसेस दोन्ही गटासाठी एकूण १२ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. हि केवळ स्पर्धाच नव्हे, तर या माध्यमातून महिलांना ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये करिअरच्या उत्तम संधी मिळणार आहेत. निवड झालेल्या मॉडेल्सना स्मृती एन्टरप्रायजेसच्या आगामी विविध जाहिराती, अल्बम सॉग्स आणि मॉडेलिंग प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची संधी दिली जाईल. असे पत्रकार परिषदेत आधार शिंदे यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे, ‘पेन्टेन स्टुडिओस’ आणि ‘स्मृती एन्टरप्रायजेस’ एकत्रितपणे ‘जयोस्तुते’ हे मराठी भाषा गीत घेऊन येत आहेत. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणाऱ्या ४० स्पर्धकांना या अधिकृत अल्बम सॉगमध्ये झळकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. याप्रसंगी मंचावरील स्मृती बोनगे, आधार शिंदे, चंद्रकांत जायभाय, सारिका तुलवे पाटील, विशाल दुभे, प्रजोत कदम यांची उपस्थिती होती. आयोजित केलेला कार्यक्रम अर्जुना सेलिब्रेशन, खामला, नागपूरला ११ एप्रिल शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत करण्याचे आयोजिले आहे. यामध्ये वयोगटः १८ ते ५५ वर्षे (मिस आणि मिसेस गट) तरी नागपूरमधील जास्तीत जास्त महिला, मुली आणि कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या स्वप्नांना नवी झळाळी द्यावी, असे आवाहन स्मृती एन्टरप्रायजेस तर्फे पत्रकार परिषदेत केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे