मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : झोंबतो वारा📘*
*🔸मंगळवार : २५/०२ /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*झोंबतो वारा*
झोंबतो वारा
गार गार गार
अंगावर काटा
फार फार फार
आहे का कोणाकडे
शाल शाल शाल
लालबुंद झाले
गाल गाल गाल
अंगात सोयटर
घाल घाल घाल
कानटोपी नसता
हाल हाल हाल
सुसाट वारा
सूं सूं सूं
कुत्र्यांचा आवाज
भू भू भू
घरी चला रे
पट पट पट
उचला पावले
खट खट खट
गरम भजी
तळ तळ तळ
खायला येईल
बळ बळ बळ
थंडीत मजा
आली आली आली
शेवटी सर्दी
झाली झाली झाली
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿
*झोंबतो वारा*
नदीकिनारी झोंबतो वारा
नाकातून येई शेंबूडाचा पसारा
देवा विनवितो याला कोणीतरी आवरा
पाण्यात करतो गळगोल भावरा
गाडीत बसलो की आला आपल्या पाठी
कुणातरी दाखवा या वाऱ्याला काठी
पावसासोबत ही याची गट्टी
हा तर बाबा फारच हट्टी
मे मध्ये कुठे लपून बसतो
गर्मी व्हायला लागली गायब असतो
जून मध्ये मात्र हा कंटाळत नाही
सुसू सूसू नुसता वाहत राही
*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿
*झोंबतो वारा*
सकाळी सकाळीच झोंबतो वारा
दिवसभर असतोय उन्हाचा पारा
रात्रीची सुटतीय ही हवा थंडगार
अंगाला लागतीया कशी हळुवार
हिवाळा गेला ना,उन्हाळा आला
दोन्ही ऋतुचा वाटे संगम झाला
ऊन लागतया आईसक्रीम खातो
रात्रीला खोकला सतावत राहतो
झोंबतो वारा हिवाळ्यात अंगाला
उठायचा कंटाळा येतो आम्हाला
शाळेला आईची उठवायची घाई
अभ्यास नाही केला मारतेय बाई
रविवार आज तर सुट्टीचा दिवस
खेळून मनाची फिटू दे ना हावस
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿
*झोंबतो वारा*
आकाशात जमले
ढग काळे काळे
थोड्याच वेळात आले
थेंब टपोरे टपोरे
घेऊनिया सांगे
गार गार वारा
हुडहुडी भरली
हा झोंबतो वारा
निसर्गात बघा
झाले किती बदल
कधीही येतो जातो
पाऊस आणि वादळ
येतो पाऊस अचानक
निघते लगेच ऊन
इंद्रधनुष्य हळूच
बघतो डोकावून
वादळ वाऱ्याने
छत गेले उडून
अंगाला झोंबतो वारा
बसले सारे पांघरून
निसर्गाची किमया
ऋतू कसे बदलतो
उन्हाळा, पावसाळा
मग येतो हिवाळा
*सुनंदा किरसान*
*अर्जुनी मोर गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १५९ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*झोंबतो वारा*
कडाक्याच्या थंडीतही
माय पायटेच उठवते
झोंबतो वारा ना वं
सारे हात पाय गोठवते
गधड्या लाज नायी वाटत
तुले सारेच ऋतू सारखे
अरे झोंबत्या वार्याची येगळीच मजा
होऊ नकोस त्या पारखे
रावू दे वं माय
सांगू नको मले कायी
झोपू दे नं वं मले
कोठं लपवलीस बोतरी मायी
कडक गरम गरम पाण्यानं
तुले आंघोळ करून देते
कुशीत घेवून तुले
माया पदरानं पूसून देते
तो झोंबता वारा बी मले
वाटते आता मस्त उष्ण
लाडाणं जवर घेवून ते
माया मायेचं लाडाणं पुसणं
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿
*झोंबतो वारा*
कडाक्याच्या थंडीत
उठते आई सकाळी
कामे करते सगळी
गती तिची आगळी
मला म्हणते आई
रोज सकाळी उठावं
आंघोळ करावी छान
कामे भराभर उरकावं
पण काय करू ग आई
झोंबतो वारा थंड अंगाला
दाताची वळते बोबडी
सहन होत नाही जीवाला
नाजुक बनून सांग
कसे जगणार आपण
सकाळचा वारा करतो
मनाला तजेलदार प्रसन्न
निसर्गाची विवीध कृत्ये
पडावी अंगवळणी
वाढेल प्रतिकार शक्ती
प्रसन्नता येते जीवनी
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿
*झोंबतो वारा*
शुभ सकाळी
वाजतो भुपाळी
चिमणी पाखरे
उडती सारे
सोनेरी किरणे
पडती अंगणात
घेवून अंगावर
राहतो आनंदात
झुळझुळ वारा
तोच झोंबतो वारा
थंडगार हवा मात्र
गाठत असतो किनारा
येतो शित लहर
गारठतो सारा अंग
वापरून गरम कफडे
राहत असतो दंग
खुल्या अंगाला मात्र
थंडगार झोंबतो वारा
सारे अंग शहारतो
शोधत असतो निवारा
आईबाबा म्हणती
फिरू नका थंडीत
गरम कपडे वापरून
मस्त रहावे आनंदीत
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿
*झोंबतो वारा*
उन्हाळा,पावसाळा
आणि हिवाळा
वर्षभर चालतो
तीन ऋतूंचा सोहळा
उन्हाळ्यात होते
अंगाची काहिली
गार गार वाटे
झाडाची सावली
पावसाळ्यात आम्ही
चिंब चिंब भिजतो
सुगंध मातीचा
सर्वत्र दरवळतो
हिवाळा आला
थंडीला घेऊन
झोंबतो वारा उब
मिळे शेकोटीतून
ऋतूंचे चक्र असं
अविरत चालते
निसर्ग किमयेवर
सजीवसृष्टी जगते
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿
*झोंबतो वारा*
गरमागरम झोंबतो वारा
तपली उन्ह लासते पारा
चटचट झावा झोंबेल अंगाला
दुपट्टा बांध पोरा कानपटाला ||
वसंतऋतु चाहूल ऊन्हायाची
रखरखती उन्ह दुपारची
हिंडसी बायर लागेन ऊनायी
सामसूम सडकवरी कुणी नायी ||
पांदी शिवचे कापले झाडझुडुप
हिरावली सावली रान कुरूप
कासाविस लायने लेकर वासर
चि चि बोंबले गरमीने पाखर ||
पिसायला जिव सरवा घामान
थंड पाण्याविन ना भागे तहान
हैराण झाले प्राणी पक्षी पशू
चारापाणी कुठी धुंडू हपसू ||
भयान व्हई आग चटक्याहुनी
आग्ना लाहीलाही निसर्गातनी
मले हौस नाय उन्हीत मराची
उष्मघाती कायजी घेते बाबू तब्येतीची ||
*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿
*झोंबतो वारा*
गार गार वाऱ्याची
झुळुक ही न्यारी
उन्हा च्या लाहीने
तळपती सारी
उन्हाळ्यात घेतो सारे
सावलीचा कानोसा
हिवाळ्यात मात्र घेती
सुर्य किरणांचा वसा
आम्हाला खेळायला
कोणताही ऋतू चालतो
मित्रांना घेऊन आम्ही
मस्त मजा करतो
उन्हाळ्यात आई
उन्हात खेळू देत नाही
हिवाळ्यात दादा
अभ्यासाचं पाही.
आम्हा बालकांचा
विचार जरा व्हावा
गार गार वारा
अंगाशी झोंबू द्यावा.
*प्रितीबाला बोरकर*
ता. जि.नागपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹〽️🔹➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



